केडगाव प्रभाग 16 – पावसाळा सुरू… तरीही ‘ड्राय डे’ चालूच!

 उन्हाळा गेला, पाऊस आला... पण नळ कोरडाच!

🚱
 केडगाव प्रभाग 16 – पावसाळा सुरू… तरीही ‘ड्राय डे’ चालूच!

📍 उन्हाळा गेला, पाऊस आला… पण नळ कोरडाच!
केडगावच्या प्रभाग 16 मधील नागरिकांना अजूनही आठवड्यातून एकदाच पाणी… तेही “लॉटरी लागल्यासारखं!” 😡

💥 भाजप युवा मोर्चाचे सुजय मोहिते मैदानात उतरले!
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिलं थेट निवेदन –
“पाणीटंचाईचा प्रश्न चिघळलाय, पावसाळ्यातही सहा-सात दिवसांनी पाणी? हे कोणतं प्लॅनिंग?”

🏘️ भूषणनगर, शिवाजी नगर, अंबिका नगर, शाहूनगर, मराठा नगर…
या भागात लोकांना रोजची कामं, अंघोळ, स्वयंपाक, सगळंच पाण्यावाचून!
“किती दिवस सहन करावं?” असा संतप्त सवाल लोकांचा!

 

🛑 सुजय मोहिते यांचा इशारा:
“नागरिकांना पुन्हा रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका… तातडीने पाणी योजना फुल क्षमतेने सुरू करा!”