केरळच्या वायनाड मध्ये भयावह भूस्खलन, १२३ जणांचा मृत्यू

केरळच्या वायनाड मध्ये कोसळले आभाळ.

केरळ – केरळच्या निसर्गसौंदर्य लाभलेल्या वायनाड जिल्ह्यावर आज आभाळ कोसळ्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजता वायनाड जिल्ह्यातील ४ गावात मोठ्या प्रमाणावर तसेच घटनास्थळी अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुडक्कई,चुरलमला, अट्टमला, नूलपुझ्झा या गावासाठी मंगळवारची पहाट भयानक ठरली असून, ४ तासात ३ वेळा मोठे भूस्खलन झाले आहे. या गावातील शेकडो घरे डिगाऱ्या खाली अक्षरशः गाडली गेली आहेत. एकट्या चूरलमला गावातील २०० घरांची पडझड झाली असून, शेकडो नागरिक अजूनही दलदलीत अडकले आहेत. गावात सध्या नदीवर तरंगणारे मृतदेह, तुटलेले पूल, वाहून गेलेले रस्ते, असे भयावह चित्र मंगळवारी(ता.३०) सकाळी दिसत होते. या घटनेची माहिती समजतात प्रशासनाने एनडीआरएफ व एसटीआरएफ च्या तुकड्या तैनात केल्या आहेत. कुन्नूर वरुन लष्कराची २२५ जवानांची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. यात वैद्यकीय पथकाचा देखील समावेश आहे. तसेच हवाई दलाचे २ हेलिकॉप्टर देखील बचाव कार्यासाठी रवाना करण्यात आले होते, परंतु हवामान खराब झाल्याने हेलिकॉप्टरला कोझीकोड ला परत पठवण्यात आले आहे.

पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये मुसळधार पावसामुळे याच भागात भूस्खलन झाले होते, त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ५ जणांचा शोध अद्याप लागला असून, ५२ घरांची हानी झाली होती, मुंडक्कई गावाला भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणी बचाव पथक पोहोचण्याचा कशोशिने प्रयत्न करत आहेत. एनडीआरएफचे पथक पायवाटेने गावात पोहोचत आहे तर मुंडक्कई येथे २५० पेक्षा अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी असंख्य घर वाहून गेली आहेत. तसेच यागावात ६५ कुटुंब असून, तेथील चहा मळ्यात काम करणारे ३५ कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. जिल्हा पंचायत अध्यक्ष शमशाद मरईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडक्कईसाठी रस्ते मार्गाने सध्या तरी मदत पोहोचवता येणार नाही, मोबाईल नेटवर्कही ठप्प झाले आहेत. काहींना वाचवण्यात यश आले आहे. यात दोन परकीय नागरिकांचा समावेश आहे. ते एका घरात थांबले होते. याठिकाणी बचाव पथक प्रत्येक ठिकाणी तपासणी करत आहेत. हवामान खात्याने वायनाड व्यतिरिक्त कोझीकोड, मल्लपुरम, कासरगोड येथे रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाची शक्यता असुन, त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येउ शकतात. केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी वेथेरी, कलपट्टा, मेप्पादी, आणि मनंतवडी येथिल रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच केझीकोड जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करपण्यात आली आहे. शिवाय ग्रेनाईटच्या खाणी देखिल तात्पुरत्या बंद केल्या आहेत. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार, चुरलमला येथे जखमींवर उपचार करण्यासाठी मशिद आणि मदरसा येथे तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला असुन. केंद्राकडुन केरळला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांनाा प्रत्येकी २ लाख तर जखनींना ५० हजारांची मदत करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. वायनाडमध्ये काबिनी नदी असुन तिची उपनदी शिखरावरुन उगम पावते. भुस्खलनामुळे नदीला पुर येतो.
वायनाड जिल्हा हा केरळच्या ईशान्ये कडील भागापासुन पठार असलेला एकमेव भाग आहे. भौगोलिक दृष्ट्या ४३ टक्के भाग हा भुस्खलन प्रवन असुन, वायनाडचा ५१ टक्के भुभाग पर्वत रांगांच्या पायथ्य़ाशी आहे. त्यामुळे भूस्खलनाची शक्यता अधिक असते.