‘गडासाठी श्रमदान, इतिहासाशी नातं – तिकोणा मोहिम सज्ज!’

 खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गडकोट संवर्धन मोहिमेचा नवा अध्याय

🏰
 ‘गडासाठी श्रमदान, इतिहासाशी नातं – तिकोणा मोहिम सज्ज!’
🔥 खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गडकोट संवर्धन मोहिमेचा नवा अध्याय

📍 पारनेर | पोलीस न्यूज नेटवर्क अपडेट

शिवप्रेम, इतिहास, पर्यावरण आणि समाजकार्य यांचं अनोखं मिश्रण म्हणजे खासदार नीलेश लंके यांच्या गडकोट संवर्धन व स्वच्छता मोहिमेचा पुढचा टप्पा – तिकोणा किल्ला!

🗓️ रविवार, २७ जुलै रोजी ही मोहीम आपला मावळा आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.

🛡️ लक्ष्य स्पष्ट –
▪️ गडकोटांचा सन्मान
▪️ शिवकालीन वारशाचं संवर्धन
▪️ पर्यावरणस्नेही उपक्रम
▪️ तरुणांना इतिहासाशी जोडलं

या अभियानाची सुरुवात १० मार्च रोजी शिवनेरी किल्ल्यावरून झाली होती, आणि नंतर धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज या गडांवर स्वच्छता आणि संवर्धनाचं काम झालं. आता ‘मावळ’ भागातील तिकोणा किल्ला सज्ज आहे लंके यांच्या मोहिमेसाठी!

🚍 नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी विशेष सुविधा –
▪️ वाहनांची व्यवस्था
▪️ नाश्ता, जेवण
▪️ निवासाची सोय

🌅 सकाळी ७ वाजता मोहिमेची सुरुवात होणार असून आ. शशिकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

💬 “केवळ फोटो काढणं नव्हे, तर गडासाठी घाम गाळणं ही खरी शिवभक्ती!”
– खा. नीलेश लंके

 

⚡ या मोहिमेच्या माध्यमातून तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि इतिहासाशी जोडण्याचं महान कार्य सुरू आहे.