भंडारदऱ्यात हिरवाईचा उत्सव! भात लावणीस धमाकेदार सुरुवात
पावसाचं जोरदार आगमन, शेतकरी सुखावले – निसर्गप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतोय!


पावसाचं जोरदार आगमन, शेतकरी सुखावले – निसर्गप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतोय!
राजूर | पोलीस न्यूज नेटवर्क अपडेट
हरिश्चंद्रगड-कळसुबाईच्या कुशीत वसलेला भंडारदरा परिसर पुन्हा एकदा हिरवळीत न्हालाय! मागील काही दिवसांच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय, कारण भात लावणीला अखेर गती मिळालीये!
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, भाताचे रोपे भरभरून वाढायला लागली आहेत. काही ठिकाणी ओलाढोला जास्त झाल्याने रोपे कुजली असली, तरी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ठाम आहे – “या वर्षी पीक छान होणार!”
भातशेतीमध्ये – कोलम, इंद्रायणी, काळभोर, आंबीमोहर, बासमती, निळं भात यासारख्या वाणांची लावणी सुरू आहे. आदिवासी पट्ट्यातील पाचनई, रतनवाडी, घाटघर, शिरपुंजे, कुमशेत हे संपूर्ण परिसर स्मरणीय हिरवळीत न्हालाय.
यंदा मान्सून थोडा उशिरा आला असला तरी, आता संततधार सुरु असून लावणीसाठी परफेक्ट वेळ सुरू झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात आलेल्या अवकाळी संकटांमुळे झालेलं नुकसान यंदा टळेल, अशी आशा शेतकऱ्यांची.
डोंगरदऱ्यांतून धुकं, हिरवा साज आणि लावणी करताना घाम गाळणारा शेतकरी – हे दृश्य निसर्गप्रेमींसाठी ‘Instagram Perfect’ झालंय!
“फक्त भात पिकवत नाही, तर आपल्या भविष्याचं धान्य पेरतोय,” असं सांगणारा शेतकरी राजा यंदा हवामानाच्या साथीने आनंदात आहे!