मंचरचा गोविंदा पथक ठरला पहिला विजेता!
१ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावत दहीहंडी फोडण्याचा मान
मंचरचा गोविंदा पथक ठरला पहिला विजेता! ![🚩]()
१ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावत दहीहंडी फोडण्याचा मान 
शिर्डीच्या गोविंदा पथकाला मिळाला द्वितीय क्रमांक व २१ हजारांचे पारितोषिक
संगमनेर | गोकुळाष्टमीच्या जल्लोषात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संगमनेर प्रखंडाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव धमाकेदार पार पडला
.
३५ फूट उंचीवर सजवलेल्या दहीहंडीला मंचरच्या गोविंदा पथकाने पहिल्यांदा फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह आपल्या नावावर केले. तर शिर्डीच्या गोविंदा पथकाने द्वितीय क्रमांक पटकावत २१ हजार रुपयांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह मिळवले
.
बक्षीस वितरण खास अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासह नीलम खताळ, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, सरपंच संदीप देशमुख आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
पावसाच्या हलक्या सरी झेलत तरुणाई डीजेच्या ठेक्यावर थिरकत होती, तर लहानग्या बालगोपाळांनी कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सगळ्यांची मने जिंकली
.
आकर्षक लाईट्स, डेकोरेशन आणि जल्लोषी वातावरणामुळे संपूर्ण संगमनेर शहर गोकुळाष्टमीच्या उत्सवात रंगून गेले.
