मंदिर बचाओ कृती समितीचे मंगळवारी मंदिर उघडा आंदोलन
आंदोलनांतर तरी सरकार मंदिरे उघडण्याला परवानगी देईल का?
प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शासनाने सुट दिल्या नंतर सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे. मात्र अद्याप सर्व मंदिरे बंदच ठेवली आहेत. शासनाच्या या निर्णया विरोधात नगर मंदिर बचाओ कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील आठवड्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शासनाने त्वरित सर्व मंदिरे न उघडल्यास आंदोलन सुरु करण्याचा इशारा मंदिर बचाव कृती समितीने दिला होता. त्यानुसार मंगळवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी शहरातील शनिमंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिरे ही मंदिरे उघडून महाआरती करण्यात आली.
मंगळवार दि.24 ओगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ही महाआरती करण्यात आली. मंदिर बचाओ कृती समितीच्या या अनोख्या आंदोलनाने तरी राज्यातील मंदिरे उघडण्याला परवानगी मिळते का?? हे पाहायचे आहे. या आंदोलनाला मंदिर बचाओ कृती समितीचे वसंत लोढा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे, जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, मराठा महासंघाच्या सुरेखा सांगळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, मठ मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे, कैलास दळवी आदी उपस्थित होते.