मुंबई :
‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या लोकप्रिय चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज 4 नोव्हेंबर निधन झाले आहे. फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता.
बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फराज गेल्या काही काळापासून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर या आजाराशी झुंज देत होता.
अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरद्वारे फराज खानच्या मृत्यूची दुखःद बातमी चाहत्यांना दिली आहे.
फराजच्या जाण्याने मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे’, असे ट्विट करत पूजा भट्टने आपले दुःख व्यक्त केले आहे.