आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा वाहतूक शाखेत ठिय्या

वाहतूक शाखेच्या गलथान कारभारावर आ. संग्रामभैय्या जगताप संतापले

अहमदनगर

(संस्कृती रासने प्रतिनिधी )

शहरातून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बैठकीत झाल्यानंतरही शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाला वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवली आहे. वाहतूक शाखेच्या गलथान कारभारा विरोधात आज कार्यालयातच आंदोलन सुरू करून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, आजच्या आज अवजड वाहतूक बंद करा, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असा इशाराही यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी दिला.

 

 

वरिष्ठ आदेश काढतात, त्याची अंमलबजावणी होत नाही, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो, अवजड वाहतुकीमुळे दोन जणांचे बळी सुद्धा गेलेले आहेत, तरी वाहतूक शाखा झोपलेली आहे. त्याचबरोबर नगर शहरामध्ये अनाधिकृतपणे रस्त्याच्या दुतर्फा  वाहने उभी केली जातात यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शहराचे विद्रूपीकरण होते. यावरती ठोस कारवाई न केल्यास येत्या पंधरा दिवसात नागरिकांसह रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी दिला. लेखी आश्‍वासनानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रा.माणिकराव विधाते,नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक कुमार सिंह वाकळे,प्रा.अरविंद शिंदे, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, संभाजी पवार,अभिजित खोसे,संतोष ढाकणे,विजय सुंबे,आरिफ शेख,अमित खामकर, साहेबांन जहागीरदार,भरत गारुडकर, पप्पू पाटील,अजिंक्य भिंगारदिवे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

T