मुकुंदनगरचा पाणी व नागरीप्रश्‍न सोडविण्यासाठी

नगरसेवक आसिफ सुलतान यांचा आयुक्तांच्या दालनात छोपा काढू आंदोलनाचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगरचा  प्रभाग 3 मधील पाणी प्रश्‍नासह इतर नागरी प्रश्‍न वारंवार मागणी करुन देखील सुटत नसल्याने नगरसेवक आसिफ सुलतान यांनी बुधवारी (दि.17 मार्च) महापालिकेत आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. दालनात झोपण्याचा प्रयत्न करणारे नगसेवक सुलतान यांना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी परिमल निकम व उपायुक्तांनी बाजूला घेतले. तर आयुक्त शंकर गोरे यांनी दुपारी चार वाजता बैठक घेऊन सदर प्रश्‍नी मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याने. झोपा काढू आंदोलन मागे घेण्यात आले. हा प्रश्‍न आश्‍वासन देऊन देखील मार्गी न लावल्यास मनपाच्या अंदाजपत्रकीय सभेत आत्मदहन करण्याचा इशारा सुलतान यांनी दिला आहे.
मुकुंदनगरचा  प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असून, याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार असून, सदर परिसर मुस्लिम बहुल भाग असल्याने या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. प्रभागातील अनेक ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामध्ये फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे.

Also see this and subscribe 

 

पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली मात्र ती कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन द्यावे, पाण्याची टाकी स्वच्छ व निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करण्यात यावे व प्रभागांमधील वॉल मॅनचा वेळ वाया जाणार नाही अशा पध्दतीने वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्याची मागणी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी केली आहे. तसेच प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने या भागात मनपा कर्मचारींचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. मुकुंदनगरचा  स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने प्रभाग पुर्णपणे स्वच्छ होत नाही. या समस्यांचा कायमस्वरूपी निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडू कामगारांची संख्या वाढवण्यात यावी, कामगारांना छोटे कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात यावे, घंटागाडीची संख्या वाढवण्यात यावी. या भागांमध्ये ड्रेनेजलाईन तुंबून रस्त्यावरुन घाण पाणी वाहत असल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली आहे. ड्रेनेजचे पाईप खचले असून ते दुरुस्त करून नवीन लाईन टाकण्यात यावी. प्रभागात काही ठिकाणी पथदिवे नसून व काही ठिकाणी बंद पडले आहे. परिणामी अंधारामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून, अनेकवेळा अपघातही होत आहे. तरी बंद पथदिवे दुरुस्त करावे. शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून, ती त्वरीत कार्यान्वीत करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.
मुकुंदनगरचा  प्रभाग 3 मधील पाणी प्रश्‍नासह इतर नागरी प्रश्‍न वारंवार मागणी करुन देखील सुटत नसल्याने नगरसेवक आसिफ सुलतान यांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. (छाया-साजिद शेख-नगर)

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.