ठाणे :
नाशिक येथील एक कुटुंब कल्याण येथून लग्न समारंभ उरकून आपल्या सेलेरो गाडीने आपल्या घरी नाशिककडे निघाले होते. आज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी मुंबई-नाशिकमहामार्गावर शहापूर येथील कानविंदे फाट्यावर सेलेरो गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपली गाडी कानविंदे फाटा येथे रस्त्याच्या बाजूला लावली आणि गाडीमधील आपल्या कुटुंबाला गाडीच्या बाहेर उतरवलं.
काहीच वेळात बघता-बघता डोळ्यासमोर संपूर्ण गाडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट झाल्याने गाडी जळल्याचा अंदाज गाडी चालकाने व्यक्त केला.
या गाडीमध्ये 3 लहान मुलं, 3 महिला आणि 2 पुरुष असे गाडी चालकासह एकूण 8 जण होते. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची इजा झाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या सर्वजण सुखरुप आहेत