अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर (स्वायत्त) यांच्या संगीत विभाग तर्फे आयोजित ‘नगारा संगीत महोत्सव 2025’ मंगळवार दि. 11 फेब्रुवारी ते बुधवार दि. 12 फेब्रुवारी या रोजी संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय छोटा ख्याल वैयक्तिक गायन स्पर्धा, तसेच राज्यस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा याठिकाणी संपन्न झाल्या. यासोबतच पंडित कृष्णा बोंगाणे आणि अंकिता जोशी यांचा बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ‘जसरंगी जुगलबंदी’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा रसिकांनी मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला. नगारा संगीत महोत्सव 2025 चे बक्षीस वितरण समारंभ गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वाजता ‘राजश्री शाहू महाराज सभागृह’ येथे संपन्न झाला. नगारा संगीत महोत्सव 2025 चे आयोजन विभागप्रमुख प्रा. आदेश चव्हाण, कला शाखा समन्वयक प्रा. डॉ. किसन अंबाडे, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, संचालक डॉ. बी. एच. झावरे आणि प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या वतीने करण्यात आले होते. नगारा महोत्सवात प्रा. कल्याण मुरकुटे, प्रा. योगेश अनारसे, प्रा. अभिजीत अपस्तंभ तसेच समस्त संगीत विभाग शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यास प्रयत्न केले.