न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज च्या कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

लोककला टिकवण्यासाठी समाजात जागर व्हावा - शाहीर हरिदासजी शिंदे

नगर- मोबाईल व टीव्हीच्या युगात लोक कला जपण्यासाठी समाजात जागर झाला पाहिजे व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे. लोककलेचे शरीर जरी मनोरंजन असेल तरी आत्मा प्रबोधनाचा असावा लोकसंगीत हे सर्वसामान्य जीवनाशी निगडित आहे.शिवाजी घडविण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे स्त्रियांमध्ये लोककलेची आवड असणे गरजेचे आहे.पैसा हे जीवनाचे साधन आहे जीवनाचे साध्य नाही.वासुदेव म्हणजे धर्म रक्षक वासुदेव म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे.या कार्यक्रमातून महाराष्ट्रातून लुप्त होत चाललेल्या शिवकालीन लोककलांना जपण्याचे काम व त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन शाहीर हरिदासजी शिंदे यांनी केले
     न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज च्या कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत वाघ, अँड.दीपलक्ष्मी म्हसे ,जी.डी खानदेशी ,दीपक दरे ,निमाताई काटे, कॅप्टन चौधरी, आदी उपस्थित होते.
     अध्यक्ष भाषणात वाघ म्हणाले की, मनुष्य शरीराने सुदृढ झाल्यास तो चांगले विचार करतो .त्याच्या हातून चांगले कार्य घडते .खेळाडू वृत्तीने हार न मानता सातत्याने प्रयत्न करणे व अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेचे वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कौशल्य वर आधारित  शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण होते, असे मत संस्थेचे सहसचिव जयंत वाघ यांनी मांडले.
     ‘वारसा महाराष्ट्राचा ‘ या कार्यक्रमात शाहीर हरिदास शिंदे यांनी रसिक होऊ दे रंग चढु दे  नटरंग लेहरा तालबाजी ),गणराया ताराया ( गण )
सुंदर माझे जाते गं (ओवी उखाणा ),तू ऐक ना ग बाई पिंगळा महाद्वारी ( पिंगळा ), गाव जागा झाला सारा, उजळून आल आभाळ,वासुदेव आला हो,प्रबोधन ( बतावणी ),आली हासत खेळत( पोतराज ), लावणी, चमके शिवबाची तलवार,पालखी ( छबीना ),जागरण गोंधळ आदी कार्यक्रम करून  विद्यार्थ्यांमध्ये लोककलांचा जागर केला.
      उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र जाधव यांनी केले. स्वागत गीत संगीत विभागाने केले. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा .कल्पना दारकुंडे ,स्वागत प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे ,अतिथी परिचय डॉ प्रा.दत्तात्रय नकुलवड ,अहवाल वाचन मंदाकिनी कराळे, आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. सुभाष गोरे यांनी केले.