पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्या!

जानेवारीत आपल्या कामांचे नियोजन आधीच करून ठेवा.

विविध सण, उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्या यामुळे जानेवारी २०२५ मध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र यातील काही सण व उत्सव स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्या कमी जास्त होतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे.

दिनांक / सुट्टीचे कारण / कुठे?

 

१ जानेवारीबुधवार                – नववर्षानिमित्त सुटी – देशभर

२ जानेवारीगुरुवार                – मन्नान जयंती – केरळ

५ जानेवारीरविवार               – देशभर

६ जानेवारीसोमवार             – गुरु गोविंद सिंह जयंती – पंजाब, अन्य राज्यांत

११ जानेवारीदुसरा शनिवार  – देशभर

१२ जानेवारीरविवार            – देशभर

१३ जानेवारीसोमवार           – लोहाडी सण – पंजाब, अन्य राज्यांत

१४ जानेवारीमंगळवार         – मकर संक्रांत, पोंगल – तामिळनाडू, आंध्र प्रदेश

१५ जानेवारीबुधवार             – टुसू पूजा – प. बंगाल व आसाम

१६ जानेवारीगुरुवार            – उज्जवर तिरुनाल – तामिळनाडू

१९ जानेवारीरविवार            – देशभर

२३ जानेवारीगुरुवार            – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती – अनेक राज्यांत

२५ जानेवारीचौथा शनिवार – देशभर

२६ जानेवारीरविवार           – प्रजासत्ताक दिन – देशभर

३० जानेवारीगुरुवार            – सोनम लोसार – सिक्किम