
बोगस यादीचा आरोप, 40-50 नावे फेक!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात घोटाळ्यांची रेलचेल आता काही नवीन राहिली नाही, पण यावेळी प्रकार थेट पक्ष प्रवेशातच घोटाळा झाल्याचा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये अकोले तालुक्यातील एका नेत्याने बोगस नावांची यादी देऊन पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप समोर आला आहे! 

हा प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उघड झाला असून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे!
नेमकं काय झालं?
26 एप्रिल रोजी अकोले तालुक्यातील माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी आपल्या समर्थकांसह ठाणे येथे शक्ती प्रदर्शन करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी अनेक सरपंच, नगरसेवक, कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा दावा केला होता.
पण आता जो लिस्ट सादर करण्यात आला होता, त्यावरून वाद उफाळलेत! 
अनेकांनी स्वतःचे व्हिडिओ काढून स्पष्ट केलं की “आम्ही कुठलाही पक्ष प्रवेश केलेला नाही!”
यामुळे 40-50 नावं बोगस असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे!
शिंदे गटात खदखद सुरूच…
शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी स्पष्ट केलं –
“मारुती मेंगाळ यांच्या प्रवेशाची पूर्वसूचना पक्षाला दिली गेली नव्हती.
शहानिशा केल्यानंतर कळलं की सादर केलेल्या यादीतील बरीच नावे बनावट आहेत.
ही पक्षाची फसवणूक असून, आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.”
पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आता वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
मेंगाळ उद्या भूमिका स्पष्ट करणार
9 ऑगस्ट – आदिवासी दिनाच्या दिवशी मेंगाळ यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलं असून, मुख्यमंत्र्यांना आमंत्रणही दिलं आहे.
पण त्याआधीच त्यांच्यावर बोगस यादी सादर करून पक्षाचा वापर केल्याचा आरोप झाल्याने सर्वांचे लक्ष या कार्यक्रमावर व मेंगाळ यांच्या स्पष्टीकरणावर लागले आहे.
मेंगाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे जाहीर केले आहे.
राजकारणात ‘हे’ नवीन घोटाळ्याचं स्वरूप?
फक्त मतांसाठी लोकांची नावं लिस्टमध्ये टाकायची,
पक्षाचा बॅनर वापरायचा आणि जनतेला गंडवायचं?
यामुळे पक्षही संभ्रमात आणि जनताही संभ्रमात! 
पक्षातील शिस्त, पारदर्शकता आणि निष्ठा या गोष्टी कुठे हरवल्या आहेत?
युवांनो, राजकीय डोळसपणा ठेवा!
बॅनरमागे कोण आहेत, ते ओळखा!
#ShivSenaScam #FakeEntryList #PoliticalFraud #EknathShinde #MetroPortal #AhilyanagarPolitics #पक्षप्रवेश_घोटाळा #BreakingNews 



