

देशातील लाखो कुटुंबांना आता मिळणार स्वतःचं हक्काचं घर!
भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलाय, आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार अशी अपेक्षा आहे. पण दुसरीकडे आजही लाखो लोक बेघर आहेत.
हाच विचार करून मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केली होतीप्रधानमंत्री आवास योजना (PMAY).
आतापर्यंत या योजनेतून लाखो नागरिकांना घर मिळालं आहे. आणि आता सुरू झालाय या योजनेचा दुसरा टप्पा – PM Awas Yojana 2.0! 
या योजनेत प्राधान्य कोणाला?
झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे नागरिक
अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील कुटुंबं
अल्पसंख्यांक
विधवा महिला 
अपंग व निराधार व्यक्ती 
सफाई कर्मचारी
थोडक्यात सांगायचं तर – समाजातील वंचित आणि खरंच घराची गरज असलेल्या घटकांना या योजनेतून थेट फायदा होणार आहे.
योजना कशी आहे?
- PM आवास योजना दोन प्रकारात राबवली जाते –
ग्रामीण भागासाठी
शहरी भागासाठी - मध्यमवर्ग, कमी उत्पन्न गट (LIG), आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांनाही लाभ मिळणार आहे.
- घर बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं.
महाराष्ट्रातही या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा लाखो कुटुंबांना मिळालाय. अलीकडेच राज्यात यासाठी सर्वेक्षणही करण्यात आलं होतं.
अर्ज कुठे करायचा?
अर्ज करण्यासाठी दोन सोपे मार्ग –
ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
स्थानिक महानगरपालिका / नगर परिषद / ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सुद्धा अर्ज करता येतो.
म्हणजेच, अर्ज करणं खूप सोपं असून गरजू नागरिकांनी ही संधी सोडू नये.
PM Awas Yojana 2.0 का खास?
गरजू लोकांसाठी हक्काचं घर 
सरकारी अनुदान 
शहरी + ग्रामीण दोन्ही भागात लागू
वंचित घटकांना थेट फायदा
तर मित्रांनो, जर तुमचं अजून स्वतःचं घर नसेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि भाड्याच्या घरातून बाहेर पडा, स्वतःच्या घरात सुखाने राहा! 
तुमचं मत काय?
ही योजना खरंच गरीबांना घर मिळवून देईल असं वाटतंय का?
की प्रक्रिया अजून सोपी व्हायला हवी?
तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये लिहा! 

#PMAwasYojana #HousingForAll #MetroNews #GovernmentScheme #ViralNews #Maharashtra
ग्रामीण भागासाठी
शहरी भागासाठी
ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
स्थानिक महानगरपालिका / नगर परिषद / ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सुद्धा अर्ज करता येतो.