शर्यतीचा थरार झाला प्राणघातक!

मळा परिसरात २९ जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिसून आलं. नागपंचमीच्या दिवशी झालेल्या विनापरवाना बैलगाडा शर्यतीत एका बैलगाड्याने आपला मार्ग भरकटवत थेट प्रेक्षकांमध्ये घुसून धडक दिली. या अपघातात संजय आसाराम जाधव (वय ५५, रा. बोल्हेगाव गावठाण) यांचा जागीच मृत्यू झाला.

📢
 शर्यतीचा थरार झाला प्राणघातक!

भिंगारच्या बैलगाडा शर्यतीत प्रेक्षकांमध्ये घुसलेल्या बैलाच्या धडकेत एका प्रेक्षकाचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर (भिंगार) – मळा परिसरात २९ जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिसून आलं. नागपंचमीच्या दिवशी झालेल्या विनापरवाना बैलगाडा शर्यतीत एका बैलगाड्याने आपला मार्ग भरकटवत थेट प्रेक्षकांमध्ये घुसून धडक दिली. या अपघातात संजय आसाराम जाधव (वय ५५, रा. बोल्हेगाव गावठाण) यांचा जागीच मृत्यू झाला. हे भिंगारच्या मोरे मळा परिसरात २९ जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिसून आलं. नागपंचमीच्या दिवशी झालेल्या विनापरवाना बैलगाडा शर्यतीत एका बैलगाड्याने आपला मार्ग भरकटवत थेट प्रेक्षकांमध्ये घुसून धडक दिली. या अपघातात संजय आसाराम जाधव (वय ५५, रा. बोल्हेगाव गावठाण) यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास आलमगीर ते मोरे मळा रोडवर घडली. स्थानिक आबासाहेब गोरे व गोकुळ पवार (दोघे रा. मोरे मळा) यांनी संगनमत करून ही शर्यत आयोजित केली होती. मात्र, या शर्यतीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती, तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

शर्यत सुरू असताना गोंधळात एका बैलगाड्याचा ताबा सुटला आणि ती थेट प्रेक्षकांच्या गर्दीत घुसली. तिथे शर्यत पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या संजय जाधव यांना बैलाची जबरदस्त धडक बसली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे मोरे मळा परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारतीसहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयोजक आबासाहेब गोरे व गोकुळ पवार यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०५, २२३, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत आहेत.

📌 सुरक्षितता नसलेली परंपरा मृत्यूला निमंत्रण देऊ शकते!

 

🔴 परंपरांचे जतन महत्वाचे – पण जबाबदारीने!
🔴 नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ!
🔴 प्रशासनाने अशा घटनांना गांभीर्याने घेऊन कठोर पावले उचलावीत – अशी जनतेतून मागणी.