अहमदनगर मधील विविध ठिकाणी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी.॥

….अहमदनगर मधील विविध ठिकाणी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी…..

 

माळीवाडा ( किरण चाबुकस्वार मित्र मंडळ )

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील किरण चाबुकस्वार मित्र मंडळाच्या वतीने लापशीचे वाटप करताना किरण चाबुकस्वार, धर्मा चाबुकस्वार, जाकिर पठाण, किरण शिंदे, राजू घासे, महादेव नेटके, प्रिया चाबुकस्वार, सीमा घंगाळे, सोनू चाबुकस्वार, सारा चाबुकस्वार, संगीता विधाते, जया चाबुकस्वार, सुनिता विधाते, अक्षता कदम, चंद्रकला बनसोडे, संजय शेफाडे, उत्तमराव साठे, बाबासाहेब आव्हाड, रवी भिंगारदिवे, राजकुमार विधाते आदी उपस्थित होते.

 

मार्केटयार्ड चौक ( आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना )

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर संघटनेच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप (नाना) कापडे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, महिला सेल अध्यक्षा सविता हराळ, जनसंपर्क अधिकारी संतोष वाघ आदी उपस्थित होते.

 

मार्केटयार्ड ( राष्ट्रवादी सेवा दल )

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी सेवा दलाच्या वतीने मार्केट यार्ड येथे आईस्क्रीम वाटप करताना आमदार संग्राम जगताप समवेत शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळी, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे महिला शहर अध्यक्ष साधनाताई बोरुडे, संजय सपकाळ, बंडू आव्हाड, लहू कराळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

एम्पिरियल चौक ( एकता मित्र मंडळ )

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित एम्पिरियल चौक येथे एकता मित्र मंडळ, अफजल शेख फ्रेंड सर्कल, संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खाद्यपदार्थ वाटप करताना आमदार संग्राम जगताप समवेत परिमल निकम, पै.गणेश साळवे, निखिल शिंदे, योगेश थोरात, सुरेश बनसोडे, सोहेल शेख, पै. नितीन रासकर, वाहिद बिल्डर, सचिन छजलानी, निरंजन साळवे, विकी थोरात, रईस शेख, परवेज शेख, इरफान मामा, कुणाल हरबा, नेहाल शेख, बंटी शेख  आदी सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जिल्हा परिषद ( महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ )

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या अभिवादन कार्यक्रमासाठी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, महासचिव सुहास धीवर, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रणसिंग, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, पोपट खंडागळे, सतीश केळगंद्रे, श्याम गोडळकर, विजय तरोटे, बाबासाहेब पारधे, बुध्दानंद धांडोरे आदी उपस्थित होते.

 

कल्याण रोड ( साईराम सामाजिक सोसायटी )

कल्याण रोड येथील साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महापौर रोहिणीताई शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, सचिन शिंदे, साई राम सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, सोमनाथ बोऱ्हाडे, दत्तात्रेय पारखे, श्रीपाद वाघमारे, दिनेश शिंदे, राजेश पंचमुख, उमेश क्षीरसागर, अतुल मिसाळ, चंद्रकांत फसले, नागेश वाहवळ, बालाजी श्रीराम, गोरख चौकटे, अक्षय सूर्यवंशी, ख्वाजा सय्यद, केदळे सर, सुनिता शिंदे, बेरड मावशी, डागवाले मामी, शिल्पा बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.

भिंगार 

भिंगार शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अभिजीत सपकाळ, कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, रमेश वराडे, दिपक बडदे, सिद्धार्थ आढाव, शिवम भंडारी, योगेश करांडे, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, संतोष हजारे, सागर चाबुकस्वार, संतोष धीवर, रमेश भिंगारदिवे, किशोर भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, सदाशिव मांढरे, सौरभ रासने, वसंत राठोड, अक्षय भांड, डॉ. गीतांजली पवार, शितल भुजबळ, सुनिता कदम आदी उपस्थित होते.

भिंगार ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ) 

भिंगार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भाजपचे शहराध्यक्ष तथा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष वसंत राठोड, सुनिल काळे, रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, शहापूर केकतीचे सरपंच देवराज भालसिंग, आयटी सेलचे जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, भारतीय वाल्मीक संघटनेचे अध्यक्ष तालेवर गोहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, रोहित कांबळे, विक्रम चव्हाण, अशोक भोसले, महेश भिंगारदिवे, गौतम कांबळे, धनराज जाधव, संतोष कांबळे, दिनेश कांबळे, प्रशांत पाटोळे, संतोष हजारे, अभिजित सपकाळ, जहीर सय्यद, पोलिस नाईक राहुल द्वारके आदी उपस्थित होते.