राज-उद्धव पुन्हा एकत्र? पण शंकराचार्यांचं भाकीत वेगळंच!
५ जुलै 2025: महाराष्ट्रात ऐतिहासिक क्षण – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनी एकाच मंचावर!

५ जुलै 2025: महाराष्ट्रात ऐतिहासिक क्षण – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनी एकाच मंचावर!
महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचे संकेतही दिले… पण!
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं भाकीत:
“यांची युती होणार नाही… झाली तरी जास्त काळ टिकणार नाही.”
त्यांनी दिले स्पष्ट कारण:
- राज आणि उद्धव यांचं राजकारण वेगवेगळं
- त्यांचे सहकारी आणि विचारसरणी भिन्न
- राज ठाकरे एका समाजाभोवती, तर उद्धव सर्वसमावेशक
मराठीबद्दल घणाघाती मत:
“राज ठाकरे म्हणतात, ‘मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत द्या पण व्हिडीओ नका काढू.’
हे खुलेआम गुन्हा करायला सांगणं नाही का?”
ठाकरे मगधहून आले होते, मराठी शिकून मोठे झाले… आता मराठीसाठी भांडतात!
मराठीला मारहाणीची भाषा बनवायची का? असा सवाल शंकराचार्यांनी केला!