प्रोफेसर कॉलनी चौकातील कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त!
आरोग्यास गंभीर धोका!डेपो तत्काळ हलविण्याची जोरदार मागणी!
प्रोफेसर कॉलनी चौकातील कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त!
आरोग्यास गंभीर धोका!
डेपो तत्काळ हलविण्याची जोरदार मागणी! ![🚨]()
![🏘️]()
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ असलेला कचरा डेपो नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरत असून, या डेपोमुळे परिसरात असह्य दुर्गंधी, अस्वच्छता आणि आजारांचे सावट निर्माण झाले आहे ![😷]()
. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे डेपो तात्काळ इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या वतीने प्रणव भिंगारदिवे यांनी मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, “या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरते, माशा आणि डासांचा प्रचंड उपद्रव होतो, ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.”
परिसरातील लहान मुलांचे आणि वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, श्वसनासंबंधी त्रास, ताप, त्वचारोग यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. “आम्ही घरात बसलो तरी दुर्गंधीपासून सुटका नाही,” असे स्थानिक रहिवासी सांगतात.
प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान हडको, साधना सोसायटी, एलआयसी कॉलनी, आदर्श कॉलनी आणि लॉईड कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येऊन मनपा प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे –
“डेपो हलवा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू! 
”
नागरिकांच्या या निवेदनावर शोभा भिंगारदिवे, सौरभ ढोकरीया, मनोज बलदोटा, डॉ. सुमित नलावडे, गणेश गावडे, बाळासाहेब निकम, निलेश वाघ, आशुतोष बांगर, मीना वाघ, वर्षा बोराडे, सुरेखा भिंगारदिवे, सुनिता आगरकर, शुभम गवळी, सारंग मुळे, रमेश हिवाळे, दीपक आडेप, दिग्विजय गावडे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “डेपोमुळे परिसरात दूषित वायू पसरतो आहे आणि तो थेट वातावरण आणि आरोग्यावर परिणाम करत आहे. मनपाने या ठिकाणी त्वरित कारवाई करून पर्यायी जागा निश्चित करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रणव भिंगारदिवे यांनी सांगितले की,
“महापालिकेने या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू. शहरातील स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली नागरिकांना आजार दिले जात आहेत, हे अन्यायकारक आहे.”

प्रोफेसर कॉलनी चौकातील कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त! 

. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे डेपो तात्काळ इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या वतीने प्रणव भिंगारदिवे यांनी मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, “या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरते, माशा आणि डासांचा प्रचंड उपद्रव होतो, ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.”
परिसरातील लहान मुलांचे आणि वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, श्वसनासंबंधी त्रास, ताप, त्वचारोग यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. “आम्ही घरात बसलो तरी दुर्गंधीपासून सुटका नाही,” असे स्थानिक रहिवासी सांगतात.
प्रोफेसर कॉलनी, प्रेमदान हडको, साधना सोसायटी, एलआयसी कॉलनी, आदर्श कॉलनी आणि लॉईड कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येऊन मनपा प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे –
नागरिकांच्या या निवेदनावर शोभा भिंगारदिवे, सौरभ ढोकरीया, मनोज बलदोटा, डॉ. सुमित नलावडे, गणेश गावडे, बाळासाहेब निकम, निलेश वाघ, आशुतोष बांगर, मीना वाघ, वर्षा बोराडे, सुरेखा भिंगारदिवे, सुनिता आगरकर, शुभम गवळी, सारंग मुळे, रमेश हिवाळे, दीपक आडेप, दिग्विजय गावडे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “डेपोमुळे परिसरात दूषित वायू पसरतो आहे आणि तो थेट वातावरण आणि आरोग्यावर परिणाम करत आहे. मनपाने या ठिकाणी त्वरित कारवाई करून पर्यायी जागा निश्चित करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रणव भिंगारदिवे यांनी सांगितले की,
पर्यावरणप्रेमी आणि आरोग्य तज्ज्ञांनीही या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “कचऱ्याचा अयोग्य निपटारा केल्यामुळे केवळ परिसर नाही, तर भूगर्भातील पाणी आणि हवा दोन्ही दूषित होत आहेत,” असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, डेपो तात्काळ अन्यत्र हलविण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता व्हावी आणि दुर्गंधी नियंत्रणासाठी आवश्यक उपाय त्वरित केले जावेत.
#MetroNews अहिल्यानगरच्या या बातमीद्वारे नागरिकांचा आवाज अधिक बुलंद झाला आहे! शहराच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा विचार करून मनपाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
“स्वच्छ परिसर, निरोगी जीवन – हीच आता नागरिकांची मागणी!” 