ऋषिकेश राऊत :-
आज जग प्रदूषणविरहित वाहनांकडे वळत आहे आणि ह्यासाठी इलेक्ट्रिक वाहन हा खूप चांगला पर्याय आहे. याच उद्देशाने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट व इलेक्ट्रिक स्केट स्कूटर बनवली आहे.
विद्यार्थ्यांनी खूप संशोधन केल्यावर त्यांनी इलेक्ट्याक स्केट स्कूटर या प्रकल्पावर संशोधन करण्याचे ठरवले. इलेक्ट्रिक स्केट स्कूटर हे छोट्या मुलांची किक स्कूटर या वाहनाचीच एक सुधारित आवृत्ती आहे. ही स्केट स्कूटर मोठ्या कंपन्यांमध्ये येण्या जाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अरुंद रस्त्यावरून सहजपणे जाऊ शकते. त्यामुळे कामगारांचा वेळ वाचून उत्पादन वाढू शकते. अतिशय दणकट, जास्त वजन झेलणारी ही स्कूटर नक्कीच फायदेशीर असेल.
यांत्रिकी विभागातील विद्यार्थी अनिरुद्ध रामकृष्णन, दीपक सिंग, विवेक झा यांच्या समूहाने इलेक्ट्रिक स्केट स्कूटर तयार केली आहे.यामध्ये ३५० वॅट हब मोटर, ३६ वोल्ट, ७.२ ए एच लिथियम आयन बॅटरी (स्वतः बनवलेली). ही स्कूटर २० कि. मी / तास चा वेगा पर्यंत पोहचू शकते, मात्र १५ सेकंदात. ही स्कूटर ३-५ न्यूटन मी चा टॉर्क उत्पन्न करते. एका चार्जिंग मध्ये २० २५ कि. मी. धावू शकेल. चार्जिंगसाठी २ तास लागतात.
विद्यार्थी गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकल्पावर काम करत असून, डॉ. टि. डे यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख डॉ विजय जती प्राचार्य डॉ. विजय वढाई यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक डॉ निरज व्यवहारे, संकुलाचे विश्वासु श्री तेजस पाटील व संकुलाचे चेअरमन ना. आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सध्या जे स्कूटर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्यापेक्षा ही स्कूटर स्वस्त, व या स्कूटर ची वजन उचलण्याची क्षमता पण खूप जास्त आहे. अशी ही स्कूटर प्रदूषण विरहित, किफायतेशीर, गर्दीतून, अरुंद रस्त्यावरून आरामात धावू शकणारी असल्याने आगामी काळात खूप गरजेची असेल हे नक्कीच.
कोसेना च्या संसर्गापासून डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी डी. वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी, पुणे येथील द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी मधील काही विद्यार्थ्यांनी सेमी ऑटोमॅटिक आणि सॅनिटायझर डिस्पेंसिंग रोबोट बनवला आहे. सध्या कोरोनाची स्थिती पाहता अद्यापही शाळा व महाविद्यालय उघडू शकले नाही त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे वर्ग खोल्यांना सॅनिटाइझेशन करणे हे खूप अवघड आहे, ही समस्या लक्षात घेता कमीत कमी वेळेमध्ये वर्गखोल्या सॅनिटाइझेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे.
रोबोटवरील मेकॅनिकल हाता द्वारे हा रोबोट बेंचेस च्या खाली किंवा कोणत्याही कानाकोपऱ्यात सॅनिटायझर स्प्रे करतो. तसेच ह्या हाताचा उपयोग आपण पेशंटला गोळ्या औषधी देण्यासाठी सुद्धा करू शकतो. रोबोट द्वारे लहान मुलांना आणि अगदी सर्वानाच एक चांगल्या प्रकारे सॅनिटाइझेशन ची सवय लागणार आहे, ह्या रोबोट मध्ये अश्या प्रकारची सिस्टीम आहे की ज्या मुलांनी सॅनिटायझर घेतले तोच विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोणा होण्याचा धोका हा कमी करण्यात येईल. रोबोट मध्ये इमर्जन्सी चार्जिंग सिस्टीम सुद्धा आहे. त्याद्वारे आपण आपला मोबाईल देखील चार्जिंग करू शकतो.