फरार छिंदम बंधू तोफखाना पोलिसांच्या ताब्यात 

ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल 

ऋषिकेश राऊत
अहमदनगर प्रतिनिधी :-
ऍट्रॉसिटी च्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी आणि भाजपचा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम सह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना तोफखाना पोलिसांनी आज अटक केलीय. मागील महिन्यात दिल्ली गेट परिसरातील एका गाळेधारकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्याला धमकावण्याचा प्रयत्न श्रीपाद आणि श्रीकांत छिंदम यांनी केला होता.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीने या दोघांविरुद्ध आणि त्यांच्या साथीदारांविरोधात  तोफखाना पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला होता. या घटनेपासून आरोपी फरार होते. छिंदम यांचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरु होता.

आरोपी नगर शहरात आले असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या संदर्भात शहर उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आरोपीना अटक केले असून साथीदारांचा शोध सुरु आहे. तसेच आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असल्याने चौकशी सुरु केली असल्याचे सांगितले.