रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना वेबीनारद्वारे करियर व आनंदी जीवनाबद्दल मार्गदर्शन
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भविष्याच्या वाटा शोधून त्यावर मार्गक्रमण करावे -शिक्षणाधिकारी रामदास हराळ
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय समोर ठेऊन आपल्या करिअरबद्दल जागृक राहिले पाहिजे. ध्येय गाठताना आपल्या आवडी-निवडीचा विचार करुन आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केल्यास तणाव येणार नाही. जीवन जगत अस तंत्रज्ञान व इंटरनेटच्या युगात जग जवळ आले असून, वेबीनारद्वारे एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होऊन जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे.
रोटरी इंटिग्रिटीने कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था दूर करुन त्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने घेतलेले वेबीनार कौतुकास्पद आहे. तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे.तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भविष्याच्या वाटा शोधून त्यावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी केले.
हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.
कोरोनाच्या संकटकाळात शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झाली असताना, उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या वतीने भविष्याच्या वाटा, आशा आणि आनंदाच्या या दोन दिवसीय मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेबीनारच्या उद्घाटनाप्रसंगी शिक्षणाधिकारी हराळ बोलत होते. या वेबीनारमध्ये विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी देखील उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.
यामध्ये हेल्थ आणि वेलनेस कोच डॉ. राहुल खिस्ती विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्य व सकारात्मक विचाराने आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी एखादा मैदानी खेळाचा छंद किंवा दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला. तर प्रत्येक गोष्ट सकारात्मक विचाराने करुन जीवनात तणाव निर्माण होऊ न देता प्रत्येक परिस्थितीचा सामना खेळाडूवृत्तीने करण्याचे सांगितले. प्रोफेसर सीनियर करियर काऊन्सलर श्रीकांत कलंत्री आवडीचा योग्य करिअर कसा निवडावा? याबद्दल आपला कल कोणत्याही गोष्टीकडे याबाबत जाणून घेऊन त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्याचे सांगितले. आवड असलेल्या क्षेत्रात काम करताना तणाव व नैराश्य येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्तीचा कानमंत्र दिला. रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगावकर व प्रकल्प प्रमुख चंदना गांधी यांच्या पुढाकाराने हा ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीर पार पडले. याला श्री संदीपनी अकॅडमीचे प्रायोजकत्व लाभले होते. हा कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी जावेद शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, के. बाळ राजू, निखील कुलकर्णी, डॉ. रज्जाक सय्यद, शुभश्री पटनाईक यांचे सहकार्य लाभले.