अहमदनगर :
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतलीय. यावेळी या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. नगर शहरात रेखा जरे यांची हत्या करण्यापर्यंत लोकांची मजल गेली, केडगावमध्ये दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे स्वतःलाच सरंक्षण घेण्याची वेळ आली आहे. म्हणजेच शहरात पोलिसांचा धाक राहिला नसून कायदा व सुवव्यस्था हा प्रकारचं इथे शिल्लक राहिला नसल्याच विधान त्यांनी केलं आहे.
महापालिका हद्दीतील मोकाट जनावरांचे प्रश्न , रस्त्याचा प्रश्न यांचा गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाठपुरावा करत आहोत, मात्र आयुक्त याची दखल घ्यायला तयार नसल्याची तक्रार त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केलीय.