पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन

अहमदनगर :

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे  नगर दौऱ्यावर असताना , त्यांनी  शिर्डी च्या साई मंदिर संस्थानला सदिच्छा भेट दिलीय.  यावेळी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांना श्री. साई बाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया  दिलीय.

कोरोना चे संकट जगावरून लवकर दूर  होऊन गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी प्रार्थना त्यांनी साई चरणी केलीय.  यावेळी त्यांनी साई संस्थानच्या दर्शन व्यवस्थेचं कौतुक केलं. त्याचबरोबर  साई संस्थानच्या पेहरावाबाबतच्या आवाहनाला ही प्रतिक्रिया दिलीय.