तृप्ती देसाईंचे १० डिसेंबरला शिर्डीत आंदोलन

शिर्डीतील साई संस्थानचा पोशाख बोर्ड हटवण्याची मागणी

पुणे :

 

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती  देसाईं यांनी मुख्यमंत्र्यांना मेल करून शिर्डीतील साई संस्थानचा पोशाखाचा बोर्ड हटवण्याची मागणी केलीय.  जरबोर्ड हटवला नाहीतर 10 तारखेला  शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय.   तसेच 10 डिसेंबरला शिर्डीत आंदोलन करणार असल्याचही  त्यांनी सांगितले आहे.