
खा. नीलेश लंके यांच्या पुढाकाराला यश
पारनेर | अहिल्यानगर अपडेट्स
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शनिवारच्या वेळेत झालेला बदल आता रद्द करण्यात आला असून शाळेची वेळ पुन्हा एकदा सकाळी ७.३० ते ११ अशीच राहणार आहे! हा निर्णय खा. नीलेश लंके यांच्या पत्राच्या पुढाकारामुळे झाला असून, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे.
अलीकडेच ZP प्रशासनाने शनिवारची वेळ सकाळी ९ ते दुपारी १.३० अशी केली होती, ज्यामुळे ग्रामीण भागातील पालक व शिक्षक वर्गात नाराजी पसरली होती.
खेड्यांतून येणारे विद्यार्थी आणि शेतकरी पालक यांच्यासाठी ही वेळ अडचणीची ठरत होती.
त्यानंतर खा. लंके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे पत्रव्यवहार करत शाळेची वेळ पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली होती – आणि ती दखल घेतली गेली!
लाभ काय?
सकाळी लवकर शाळा भरल्याने मुलांना कोवळ्या उन्हात योग, सूर्यनमस्कार व शारीरिक शिक्षणाचे उपक्रम घेता येणार
आनंददायी शनिवार उपक्रमांना योग्य वेळ मिळणार
पालकांच्या शेतात जाण्याच्या वेळेला अडथळा न होणं
शिक्षक संघटनाही खा. लंके यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या होत्या, आणि पालकांच्या तक्रारींनंतर हा मुद्दा गंभीरतेने घेतला गेला.
आता ZP प्रशासनाने सर्व शाळांना नव्याने आदेश दिले असून शनिवारची वेळ पुन्हा ७.३० ते ११ अशीच राहणार आहे.
खा. लंके यांचा पुढाकार म्हणजे ‘जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं उदाहरण!’
“आमचं ऐकणारं लोकप्रतिनिधी असावं तर असं!” – असं म्हणत सोशल मीडियावर लोक खा. लंकेंचं कौतुक करत आहेत.