सावित्री ज्योती महोत्सव सक्षमीकरणाची नांदी ; ९ ते १२ जानेवारीला सावित्री ज्योती महोत्सव
अहिल्यानगर : जय युवा अकॅडमीच्या माध्यमातून सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. हे महोत्सव महिला सक्षमीकरणाची नांदी ठरेल. सावित्री ज्योती महोत्सव नगरकरांसाठी नवीन वर्षात मोठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. दरवर्षीप्रमाणे सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवाचे ९ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संयोजन समितीचे ॲड. महेश शिंदे, सुहासराव सोनवणे, रावसाहेब काळे, दत्ता वामन, मेजर शिवाजी वेताळ, राजकुमार चिंतामणी, हमीदभाई शेख, मिया शेख, अरुण ढाकणे, प्रा. संजय पडोळे, बाळासाहेब पाटोळे, रजनी ताठे, आरती शिंदे, विद्या शिंदे आदीं उपस्थित होते.
जगताप यांनी विजयाची हॅटट्रीक केल्याने सावित्री ज्योती महोत्सव संयोजन समितीच्या वतीने सत्कार केला. सुहासराव सोनवणे म्हणाले की, बचत गटातील महिलांसाठी नवनवीन व्यवसाय प्रशिक्षण, कच्चामाल, वाहतूक व्यवस्था, व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजना, भांडवल, उद्योग उभारणी, बाजारपेठ आणि मार्केटिंगच्या ज्ञानासाठी हा महोत्सव उपयुक्त असल्याचे सांगितले. अहमदनगर महानगरपालिका, जय स्वयंसेवी संस्था संघटन, जिल्हा क्रीडा कार्यालय, समाजकार्य महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून हा महोत्सव घेण्यात येणार आहे.