नवी दिल्ली :
काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणूक २०२० च्या पार्श्वभूमीवर एका सभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही निवडणूक आपली ‘अंतिम निवडणूक’ असेल असं म्हटलं होतं. नितीश कुमार यांचं हे वक्तव्य म्हणजे ‘दया याचिका’ असल्याचं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी टथट्टा उडवलीय.
निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे हे लक्षात घ्या. यासाठी परवा मतदान होणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला’ असं वक्तव्य पूर्णियामध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं होतं.
नितीश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर ‘पराभवाचा स्वीकार’ करण्यात आल्याची टीका सुरू झाली आहे. नितीश कुमार यांनी हे वक्तव्य करून विधानसभा निवडणुकीत आपला पराभव स्वीकार केला आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटलंय. ‘ही आपली शेवटची निवडणूक’ हे वक्तव्य म्हणजे अपयशावर ‘दया याचिका’ असल्याचंही पी चिदंबरम यांनी म्हटलंय.