डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फेक न्यूजचा भडिमार

वृत्तवाहिन्यांनी बंद केले लाइव्ह भाषण

वॉशिंग्टन : 

महासत्ताक असलेल्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.  पराभवाच्या वाटेवर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आरोप आणि खोटे दावे केले जात आहेत.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खोटे दावे करणारे भाषण सुरू केल आहे. मात्र , ट्रम्प खोटी माहिती देत असल्याचे सांगत अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी त्यांचे लाइव्ह भाषण बंद केल आहे.  याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदानाच्या रात्री केलेल्या भाषणात अनेक चिथावणीखोर वक्तव्ये केली होती.
अमेरिकेतील एबीसी आणि एनबीसीसह इतर काही वाहिन्यांनी ट्रम्प यांचे लाइव्ह भाषण थांबवले आहे.  लोकांनी निवडणुकीवर ताबा मिळवला असल्याचा खोटा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मते चोरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.