सिरम इन्स्टिट्यूट मधील प्रयोगशाळेत ५कोटींहून अधिक डोस पडून

भारत बायोटेकने फेटाळल्या सर्व चर्चा

पुणे  :   पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लसीचे  जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय आदेशाच्या दिरंगाईमुळे हे डोस अजूनही सीरममध्येच पडून आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिलीय . या दिरंगाईमुळे केंद्र सरकारने स्वत:हून जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील ३.३ कोटी जनतेच्या लशीकरणाचे लक्ष्य गाठणे देखील शक्य होणार नाही. दरम्यान, सीरमने याबाबत  प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून म्हणजेच  सीआयआय ने न वापरलेले लसीचे  डोस सरकारने खरेदी करावेत आणि त्यांचा वापर करावा यासाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे.  “लसीकरणाच्या  सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याऐवजी सरकारने लसीकरण मोहिमेतील सर्व अडचणी आधी दूर करायला हव्यात”, असं सीआयआयच्या सुत्रांनी सांगितलं.सीआयआय  ही पुण्यातील संस्था असूनही महाराष्ट्र सरकारलादेखील पुरेसे लसीचे डोस मिळाले नसल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्र सरकारने आणखी डोस मिळण्याची अपेक्षा केली आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती देणं टाळण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सीरमने २० लाख डोस पाठवले.

Also see this and subscribe

 

 

३ जानेवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) देशात कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड लसीला  सीरम इन्स्टिट्यूटने  तात्काळ वापरासाठी मंजुरी दिली. पण कोव्हॅक्सीनच्या संपूर्ण चाचण्या झाल्या असल्याची टीका देखील याआधी करण्यात आली होती. दरम्यान, भारत बायोटकनं या संबधातील  सर्व चर्चा आणि दावे फेटाळून लावले आहेत.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.