एसटीच्या ई-बसमध्ये लवकरच नेमणार ‘शिवनेरी सुंदरी’
मुंबईविमानाप्रमाणेच आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘सुंदरी’ नियुक्त करण्याचा निर्णय महामंडळाचे नूतन अध्यक्ष भरत गोगावले यांनी घेतला आहे. प्रवाशांना आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे पद ‘शिवनेरी सुंदरी’ असेल. मुंबई- पुणे दरम्यान धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता दर्जेदार सेवा देण्यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ३४३ बसस्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ सुरू केली जाईल. त्यात माफक दरात चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध दिले जातील.