

जयसिंगपूर – सोशल मीडियावर कालपासून एक मेसेज जबरदस्त व्हायरल होत आहे
— “नांदणी मठाचा हत्ती वनतारा संस्थेला देण्यासाठी आंदोलन शांत करण्यासाठी घेतलेले 3 कोटी आता परत देणार का?”
या एका प्रश्नाने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे!
काय आहे मामला?
नांदणी हत्ती ताब्यात घेण्यापासून ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरातच्या वनताराला सुपूर्द करण्यापर्यंत घडलेल्या घटना फास्ट-फॉरवर्ड मोड मध्ये झाल्या.
आंदोलन वाढू नये म्हणून, “आमच्या समाजाचे नेतृत्व आमच्याकडे आहे, लोक आंदोलनात उतरणार नाहीत” असे सांगून काही मध्यस्थांमार्फत 3 कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला. 
वाहनं आदेश येण्यापूर्वीच सज्ज, कोर्ट आदेशानंतर तातडीची हालचाल, आणि काही कळायच्या आत माधुरी हत्ती गुजरातला रवाना. त्यानंतर जनक्षोभ उसळला, #JioBoycott ट्रेंड सुरू झाला 
.
नेता गायब मोडमध्ये
हत्ती नेण्याच्या दिवसापासून ते मंत्रालयाच्या बैठकीपर्यंत संबंधित नेता लोकेशन ऑफ होता. हेच आंदोलन थंडावल्याचं कारण असल्याचं बोललं जातंय. डील फायनल झाल्याच्या बातम्या पसरल्या, तर विरोधक सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांनी आंदोलन पुन्हा हाती घेतलं.
आंदोलनाचा ज्वालामुखी
राजू शेट्टींची मुक पदयात्रा
आणि सतेज पाटलांची सह्यांची मोहीम
यांनी आंदोलनाला नवा जोर दिला. कोल्हापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी पदयात्रा निघाली आणि जनता खवळली. मुख्यमंत्री हस्तक्षेपासाठी बैठकीला बोलावू लागले.
सोशल मीडियाचा स्फोट
– “3 कोटी परत करणार का?” हा प्रश्न कालपासून FB, WhatsApp, Insta वर धुमाकूळ घालत आहे 
– #JioBoycott पासून #JioTower बंद करण्यापर्यंत चळवळ पोहोचली
– नांदणी ग्रामपंचायतीनेही Jio टॉवर बंद करण्याचे पत्र दिले 
अखेरीस मुख्यमंत्र्यांनी वनताराला बोलावलं, हत्ती परत देण्याचा आणि संयुक्त याचिका दाखल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण जयसिंगपूरातील 3 कोटींचा मुद्दा मात्र अजूनही ताजा आणि गरम आहे. 
मेट्रो पोर्टलचा मेसेज:
“हत्ती गुजरातला गेला, पण 3 कोटींचा हिशोब अजून बाकी आहे! 
”
#NandaniElephant #3CroreDeal #PoliticalDrama #JioBoycott #SocialMediaStorm