देशपांडे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

आठ लाखांची लाच मागितल्याचे प्रकरण

नगर : आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणी देशपांडे यांच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन मनपा आयुक्त पंकज जावळे व स्वीय सहाय्यक देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही पसार आहेत. आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज, जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जाणण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. देशपांडे यांच्या वतीने ऍड. महेश तवले यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर शनिवारी सुनावणी होणार होती. मात्र आता या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. देशपांडे यांच्या वतीने जामीनासाठी युक्तिवाद केला जाणार आहे, दरम्यान खटल्यात सरकार पक्षसह मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड. अभिजीत पुप्पाल यांनी म्हणणे मांडण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.