खर्डा येथे उभे राहतंय ३ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम…

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूमिपूजन

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असणारे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यतत्परतेने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील खर्डा (ता. जामखेड) येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून ३ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम शेतकऱ्यांसाठी उभारले जाणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात नागरिकांना सुविधांचा लाभ मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांच्याद्वारे विविध विकासकामांचे आकृतिबंध तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आता खर्डा (ता. जामखेड) या ठिकाणी वखार महामंडळाच्यावतीने ३ हजार मे. टन क्षमतेच्या गोदामाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मतदारसंघातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा यामुळे मिळणार आहे.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

आपला शेतातील अधिकतम उत्पादित माल साठवणुकीसाठी या गोदामामुळे शेतकऱ्यांना सुविधा प्राप्त होणार आहे.राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते खर्डा (ता. जामखेड) येथे वखार महामंडळाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या ३ हजार मे. टन क्षमतेच्या गोदामाचे भूमिपूजन करण्यात आलं. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, सीईओ क्षीरसागर, वखार महामंडळाचे एमडी तावरे आदी प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की,”गोदामाचे बांधकाम काम पूर्ण झाल्यानंतर कमी भाव असताना माल न विकता शेतकऱ्यांना तो या गोदामात ठेवता येईल आणि भाव वाढल्यानंतर तो विकता येईल. या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष आभार मानले .