जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन

ग्रामीण रुग्णालयांमधील कंत्राटी वाहनचालकांचे थकीत वेतन मिळण्याची मागणी.

ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, वाहन चालक दीपक कांबळे, रोहित होडशीळ, कडूबाळ खरात, दत्तात्रय ठुबे, बाबासाहेब गोफने, विलास शिंदे, गुलाब शिवरकर, रुपेश घंगाळे, किशोर बनसोडे, दिगंबर मुखेकर, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

कंत्राटी वाहन चालक दि.१ एप्रिल २०२१ पासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांचे तोंडी आदेश व सेवा अभियंता अहमदनगर व वैद्यकीय अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून आजपर्यंत २४ तास सेवा देण्याचे काम करीत आहेत सर्व कंत्राटी वाहनचालकांना विमा संरक्षण नसतानादेखील कोविंड रुग्णांची सेवा करीत आहोत व आम्हाला आजपर्यंत कामाचे वेतन मिळालेले नाही तसेच कोविड भत्ता सुद्धा मिळालेला नाही.

 

 

 

तरी आम्हा सर्व कंत्राटी १०२ वाहनचालकांना समान काम समान वेतन नुसार थकित वेतन मिळावे त्याचप्रमाणे मागील ठेकेदाराकडून मागील वर्षामधील देखील काही वाहन चालकाचे वेतन मिळालेले नाही आम्ही सर्व कंत्राटी वाहन चालक १० ते १५ वर्षापासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा करण्याचे काम करीत आहेत तरी आम्हा सर्व वाहन चालकांना १ एप्रिल २०२१ पासून थकलेले वेतन लवकरात लवकर मिळावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.