विद्यार्थी आता “नोकरी मागणारे” नव्हे, “नोकरी देणारे” बनावेत – सीताराम खिलारी यांचा प्रेरणादायी संदेश!
श्री ढोकेश्वर महाविद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित कार्यशाळेत सीताराम खिलारी यांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली. "नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभारून उद्योजक बना!" असा ठाम सल्ला त्यांनी दिला.


श्री ढोकेश्वर महाविद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत आयोजित कार्यशाळेत सीताराम खिलारी यांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली. “नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभारून उद्योजक बना!” असा ठाम सल्ला त्यांनी दिला.
कार्यशाळेत डॉ. तुकाराम थोपटे (उपप्राचार्य, न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेर) यांनी “ऑन-द-जॉब ट्रेनिंग” वर सखोल मार्गदर्शन करत म्हणाले, “गुणवत्ता, चिकाटी आणि आत्मविश्वास असला की संधी तुमच्यापर्यंत येतात.”
रघुनाथ कौठेकर यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी आणि कार्यानुभवाचे महत्व समजावून सांगितले.
विशेष वैशिष्ट्य:
या कार्यशाळेत २८ उद्योजक आणि १५०+ विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. संजय गायकवाड, प्रा. शांता गडगे, प्रा. संकेत ठाणगे, प्रा. संतोष कोकाटे आणि टीमने विशेष मेहनत घेतली.
ग्रामीण विद्यार्थ्यांनी आता उद्योग क्षेत्रात वाटचाल सुरू करावी!