धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्ववुण असलेले शिवाजी महाराज : खा. सुजय विखे

भाजपाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहात साजरी

नगर : छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेले नेते
होते. सर्वांना बरोबर घेऊन रयतेसाठी स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराज हे एक महान
पराक्रमी होते. आजच्या युवापिढीने छत्रपतींचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आचरण करुन त्यांची
शिकवण अंगीकारावी. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी एक
सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आजही छत्रपतींनी अंमलात आणलेल्या विविध
योजना आपण राबवतो, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एसटी स्टॅंड येथील अश्वरुढ पुतळ्यास
भाजपाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. सुजय विखे,
महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे,
नगरसेवक अनिल शिंदे, अँड. धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
 ALso see this and subscribe

छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक : माजी खा. दिलीप गांधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे माजी खा. दिलीप गांधी यांनी
एसटी स्टॅंड येथील अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी
नगरसेवक सुवेंद्र गांधी, शरद ठुबे, अभिषेक दायमा, बाळासाहेब पोटघन, दादासाहेब मोटे, मल्हारी
दराडे, नाना जेवरे आदी उपस्थित होते.

माजी खा. गांधी म्हणाले की, छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक
आहे.  खा. सुजय विखे  युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजप्रबोधन करावे. जात-धर्म व पंथ न मानता
त्यांनी सर्वांना न्याय देऊन समता व बंधुत्व प्रस्थापित केली. रयतेला केंद्रबिंदू मानून त्यांनी
आपला राज्यकारभार केला. छत्रपतींची कामे समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्याचा उजाळा
आपण सर्वांनी देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.