छत्रपतींच्या मावळ्यांचा आदर्श घेऊन कोरोनावर मात करु या : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
छत्रपतींच्या अश्वरुढ पुतळ्यास जिल्हाधिकारी, महापौर व पोलिस प्रमुखांच्या हस्ते मानवंदना
नगर : कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा
आदर्श आपण घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करुन कोरोनाच्या संकटावर मात करून सर्वांचे
आरोग्य सदृढ व निरोगी रहावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले छत्रपतींचा आदर्श आजच्या
युवापिढीने अवलंबवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हा प्रशासन व अहमदनगर महानगर पालिकेच्यावतीने इम्पिरियल चौक येथे छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले. समवेत महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलिस प्रमुख
मनोज पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, तहसीलदार उमेश
पाटील, नगरसेवक बाळासाहेब पवार, अँड. शिवाजीराव कराळे, संजू भोर, शिवभक्त मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतना महापौर म्हणाले की, शहरातील सर्व तरुण मंडळांनी कोरोना संसर्ग
विषाणूला हद्दपार करण्यासाठी समाजामध्ये समाजप्रबोधन करावे व शासनाच्य नियमाचे पालन
करावे. डॉ. राजेंद्र भोसले आपल्यावर आलेल्या संकटावर मात करावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसमाजाला
बरोबर घेऊन समाजाच्य उन्नतीसाठी संघर्ष केला. त्यामुळेच आज सर्वसमाज गुण्यागोविंदाने एकत्र
विविध सण-उत्सव साजरे करत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मनोज पाटील म्हणाले की, ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये छत्रपतींच्या
शिवजयंतीला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. छत्रपतींची
कामे समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्याचा उजाळा आपण सर्वांनी देणे गरजेचे आहे. पुढील
वर्षभर सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करता येणार नाही, हे संकट लवकरच दूर व्हावे
आणि आपले उत्सव आपल्याला पुन्हा पारंपरिक पद्धतीने साजरे करता यावे यासाठी कोरोनाला
हद्दपार करण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी साडे आठ वाजता जिल्हा प्रशासन
व अहमदनगर महानगरपालिका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिजाऊंना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर
जिल्हाधिकारी भोसले यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.