पोलिसांकडे तक्रार केल्याने वकिलावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.