सैनिक आणि समाज पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात

सत्ताधारी प्रस्थापितांच्या घराणेशाहीने लोकशाही धोक्यात -अ‍ॅड. शिवाजी डमाळे

अहमदनगर: 

 

सैनिक आणि समाज पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सभासदांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी भाऊसाहेब आंधळे, अ‍ॅड. बि.जी. गायकवाड, अरुण खिची, भाऊसाहेब भुजबळ, तुषार औटी, राजेंद्र शिंदे, सुभाष आल्हाट, रावसाहेब काळे, अ‍ॅड. जया पाटोळे, विकास भुजबळ, विठ्ठल गीते, बाळासाहेब पठारे, महेश सरोदे, निवृत्ती कळमकर, अ‍ॅड. संदीप डमाळे आदी उपस्थित होते.

 

प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, सत्ताधारी प्रस्थापितांविरोधात जनता वैतागली आहे. घराणेशाहीने राजकारणाचे वाटोळे झाले. प्रस्थापित पुढारी राजकारणातून पैसा व पैश्यातून सत्ता मिळवण्याचे कार्य करीत असल्याने भ्रष्टाचार फोफावला गेला आहे. यामुळे लोकशाही देखील धोक्यात आली आहे. लोकशाही चालविण्यासाठी एक सत्ताधारी व दुसरा विरोधी या दोन पक्षाची गरज आहे.

 

 

 

सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष असतो. परंतु या परिस्थितीमध्ये विरोध हा खर्‍या अर्थाने होत नसून, जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्यासाठी विरोध केला जात आहे. विशेषत: जाती व धर्मावर आधारित पक्ष, पार्टी निर्माण झाल्याने देशाची एकात्मता खंडित होऊन समाजात तेढ निर्माण होत आहे. सैनिक आणि समाज पार्टी सर्वसामान्यांचे प्रश्‍न घेऊन कार्य करीत आहे. राजकिय स्वार्थ साधण्यापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रमुख उद्देश समोर ठेऊन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा :

 

शहरातून पहिले सक्रिय सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची व भाऊसाहेब भुजबळ यांची नोंद झाली असता त्यांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनेतेच्या हिताची असून, समाजकारणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.

 

 

पक्षाच्या ध्येय धोरणानूसार पक्ष बळकट करण्यासाठी कार्य करणार असल्याची भावना नूतन सक्रीय सदस्य खिची व भुजबळ यांनी व्यक्त केली. सैनिक आणि समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीरसिंग परमार यांनी नवीन सभासदांना शुभेच्छा देऊन भविष्यात सर्व निवडणुकांना पुर्ण ताकतीने सामोरे जाण्याचे स्पष्ट केले. पक्षाची ऑनलाईन सभासद नोंदणी सुरु असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी केले.