जमिनीच्या अदलाबदलसाठी राष्ट्रीय पातळीवर कमिशन नेमण्याची मागणी

ऍड. कारभारी गवळी यांची मागणी

ग्रामीण भागातील वन जमिनी शेजारील व वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान करत असलेल्या शेत जमीन घेऊन त्या मोबदल्यात शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे शहरालगत असलेल्या वनविभागाच्या खडकाळ जमिनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी देण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने केंद्रसरकार पुढे ठेवण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय पातळीवर कमिशन नेमण्याच्या मागणीचे निवेदन संघटनांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रसिंह यादव, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरजितसिंह पुरी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

देशभरात शहरा लगत असलेल्या वन विभागाच्या एक लाख एकर खडकाळ जमीनी घर बांधण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या योजनेद्वारे सामाजिक न्याय होऊन वन्यप्राणी त्रस्त शेतकरी व घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. वन्यप्राणी त्रस्त शेतकरी व घरकुल वंचितांना न्याय मिळण्यासाठी सरकारच्या इच्छाशक्तीची आवश्यकता असून, केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर कमीशन नेमूण त्याद्वारे जमीनीची अदला-बदल करण्यासाठी पुढाकार घेण्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी