नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदोष असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.
आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती.