आसामच्या बागजान क्षेत्राला लागली आग  

3 हजार लोक स्थलांतरित

दिसपूर :

आसामच्या बागजान क्षेत्रात गेल्या 150 दिवसांपासून लागलेली आग अजूनही सुरुच आहे. 9 जून रोजी एका भीषण गॅस स्फोटात आसाम सरकारच्या ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीच्या एका गॅस कंटेनरला आग लागली होती. 150 दिवसानंतरही इथं आगीच्या ज्वाला  पाहायला मिळत आहेत. ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ भडकलेली आग बनली आहे.

आग विझवण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर परिसरातील 3 हजार नागरिकांवर घर सोडून स्थलांतरितांच्या कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली आहे.  स्थलांतरित झालेल्या लोकांपैकी अनेकजण आपल्या घरी परतले आहेत.
मात्र ज्यांची घरं आग लागलेल्या ठिकाणांपासून जवळ आहेत, त्यांना अजूनही कॅम्पमध्येत राहावं लागत आहे. या आगीत आपली घरं गमावलेल्या 12 कुटुंबांना प्रत्येक 25 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीकडून देण्यात आली आहे.
तर घरदार सोडून कॅम्पमध्ये राहावं लागत असलेल्या कुटुंबाला कंपनीकडून महिन्याला ५० हजार रुपये देण्यात येत असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.