टोलनाका ठेकेदार लॉरेन्स स्वामी यांची अटक ही कायदेशीर तरतुदींचा भंग करून आहे. पोलिसांना इतर गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसेल, तर त्याला तात्काळ मुक्त करावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर-केकती ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सैनिकनगरमधील 'स्वामी रेसिडेन्सी' या बंगल्यातून लॉरेन्स स्वामी याला पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केली आहे.