लस पण घ्या आणि मास्क पण घाला
राज्यात कोव्हीशील्डचे लसीकरण सुरु ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला संवाद
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्रीसवांद साधला. लस कोणती द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेत असतं , पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केले. केंद्रानं निर्णयानं घेतल्यानं कोणतीही शंका घेऊ नये. पहिल्यांदा कोरोना योद्ध्यांना लस दिली जाईल. त्यानंतर इतरांना लस दिली जाईल. ज्या सूचना केंद्राकडून येतील त्याप्रमाणं काम होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मास्क घालणं विसरु नका, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.