अमिताभ बच्चन नंतर आता पुन्हा जस्मिन भल्ला

ऐका कोरोना लसीचे फायदे सांगणारी कॉलर ट्यून

कोरोना काळात आपल्याला सोशल  डिस्टंसीग चे नियम पाळण्याबाबत सूचना देणारी कॉलर ट्यून ऐकवली जायची आता या कॉलर ट्युनची जागा लसीकरण को व्यक्सीनची माहिती देणाऱ्या कॉलर ट्युन ने घेतली आहे. खरेतर आपल्याला या लसीकरणाबाबत अजून नीटसे काहीच माहिती नाही . कोरोनाचा कहर देशात कमी होत चाललेला असताना कोरोनाबाबतची भीती लोकांच्या मनात कायम आहे. त्यात भारतात वैज्ञानिकांनी बनविलेल्या दोन दोन लसी दाखल झाल्या आहेत . या अगोदर अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून दोन वेळा  ऐकवून  आपल्याला समजावले गेले .  त्या अगोदर एकदम सुरुवातीला जस्मिन भल्ला यांच्या आवाजातील कॉलर ट्यून ऐकवून आपल्याला कोरोनाबाबत काळजी घेण्याबाबत सांगितले गेले आणि आता को व्हॅक्सिनची माहिती देणारी कॉलर ट्यून ऐकवून हे लसीकरण किती आवश्यक आणि सक्तीचे आहे हे सांगितले जात आहे.