जामखेड मध्ये मतदान संपले

आता प्रतीक्षा निकालाची ,ग्रामपंचायतीसाठी ८२.४७ % झाले .

जामखेड तालुक्यात 39 ग्रामपंचायतींसाठी 128 मतदान केंद्र होती.  एकुण मतदारांची संख्या  67368 आहेत.  यात पुरुष मतदारांची संख्या  36147  आहे तर 31221 महिला   मतदार आहेत यापैकी  29980  पुरुष तर 25647  स्त्री या अशा एकुण 55557 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकुण 82.47 % विक्रमी मतदान झाले आहे.
दिवसभर काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क होते.  तालुक्यातील साकत येथे 90 वर्षांच्या व्यक्तींचे तीन चाकी सायकलवर येत मतदानाचा हक्क बजावला.  तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होती. त्यामुळे आकडेवारी मिळण्यास उशीर झाला होता.  तालुक्यातील खर्डा येथे 72.3 %, नान्नज 75 % साकत 82 %,  अरणगाव 79.50 %  इतका मतदान झालंय .
साकत येथे 4190 पैकी 3385 जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय.  तालुक्यात एकूण 82.47 % मतदान झाले आहे.