अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडवावे ना तनपुरे याना दिले निवेदन
अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सुधारीत सेवांतर्गतआश्वासित प्रगती योजनाच्या लाभासह, सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावांना मंजुरी देवुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन सुरू करावे.तसेच ७डिसेंबर २०१८ व १६फेब्रुवारी २०१९ हे शासन निर्णय रद्द करुन सध्या सेवेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करुन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करुन वेतननात लाभ मिळावा.अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नामदार प्राजक्तदादा तनपुरे,राज्यमंत्री,उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्रराज्य यांना अहमदनगर येथे सेवानिवृत्ती कर्मचारी शिष्टमंडळाने निवेदन दिले.यावेळी श्री.निवृत्ती कानवडे, श्री.एकनाथ देवढे,श्री.बाळासाहेब ठोंबरे, यांच्यासह माहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्हासचिव संतोष कानडे उपस्थित होते.