सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारित भव्य इमारतीचा लोकापर्ण सोहळा थाटामाटात संपन्न

उच्च विद्याविभूषित तञ् डॉक्टर एकत्र येऊन मोठ्या हॉस्पिटलचे प्रकल्प यशस्वी करून नगरकरांनी पडला नवा पायंडा

अहमदनगर (प्रतिनिधी) : सुरभी हॉस्पिटल मधील सर्व तद्न्य डॉक्टर्स हे उच्च विद्याविभूषित आहेत . ते चांगल्याप्रकारे रुग्णसेवा करतील यात तिळमात्र शंका नाही . नगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तञ् एकत्र येतात आणि मोठे प्रकल्प वर्षानुवर्षे यशस्वीपणे चालवतात . हा खरेतर नगरकरांनी या क्षेत्रात वेगळा पायंडा पाडला अशा शब्दात  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी कौतुक केले .
          अत्याधुनिक आणि विश्वासार्ह आरोग्यसेवेसाठी नगर जिल्ह्यात अल्पावधीतच गुणवत्तेच्या  यशोशिखरावर स्वार झालेल्या नगरमधील सुरभी हॉस्पिटल प्रा. ली. च्या विस्तारित रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अरुण जगताप हे होते.
   यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की ,  कोरोनाचे मोठे संकट जगावर येऊन गेले आहे. लोकांमध्ये या विषयी भीती होती . त्यामुळे लोक घराबाहेर पडले नाहीत . यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. या काळात आपण सरकारी आणि खाजगी डॉक्तरांना आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून लोकांना धीर देण्याचे काम करा  असे आवाहन  आपण मोठं मोठ्या शहरात जाऊन केले. त्याच पद्धतीने नगरमधील तञ् डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी हा प्रकल्प यशस्वी केला हे कौतुकास्पद आहे.
  वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर हा तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती असतो. सुरभी hospital ची लोकांना अशीच मदत होईल .
 पवार यांच्या हस्ते फीत कापून रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकापर्ण केले . यावेळी  नगर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. हसन मुश्रीफ, ना. प्राजक्त तनपुरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, आमदार निलेश लंके, प्रशांत गडाख , आ. लहू कानडे , साहेबराव दरेकर , राहुल जगताप , डॉ . राकेश गांधी , डॉ. आशिष भंडारी, डॉ . विजय निकम  व्यासपीठावर उपस्थित होते.
 यावेळी डॉ. राकेश गांधी यांनी पवार यांचा सत्कार केला .  दिव्य मराठीचे संपादक अनिरुद्ध देवचक्के यांनी लिहिलेले मानपत्र पवार यांना देण्यात आले .
त्यांच्या जीवनावर केलेली ध्वनिचित्रफीत येथे दाखविण्यात आली.
.             सुरभी हसोपीटलच्या वतीने काढण्यात आलेल्या हेल्थ कार्डचे अनावरण यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की ,  जगातील अत्याधुनिक यंत्रणा या हॉस्पिटल मध्ये सुरभी समूहाने आणली भविष्यात आपल्याला आरोग्य सुविधांसाठी आता मुंबई पुण्याला जाण्याची गरजच नाही. नगरवासियांच्या वतीने जगताप यांनी आभार मानले.
ना. हसन मुश्रीफ म्हणाले की , सुरभी हॉस्पिटल कडून रुग्णाची सेवा चांगल्या प्रकारे व्हावी अशी अपेक्षा आहे.  कोरोना हा रोग खूपच भयानक होता यापुढेही आपल्याला कोरोनासाठी सावधानता बाळगावी लागेल .  कोरोना काळात सुरभी ने चांगले काम केले . आता सुरभी हॉस्पिटलने  महात्मा फुले जीवनदायी योजना आणि आयुष्यमान भारत योजनेसाठी सरकारकडे अर्ज केला आहे . राज्य  सरकार ने आणि आरोग्य मंत्रालयाने याला मंजुरी द्यावी यासाठी आपण संग्राम जगताप यांच्यासोबत पाठपुरावा करू असे आश्वासन मुश्रीफ त्यांनी दिले .
डॉ . अमित पवार यांनी शेवटी आभार मानले .