चार वर्षांची प्रतीक्षा संपली!

पिंपळगाव माळवीतील शेतकऱ्यांना शेवटी मिळालाच मोकळा रस्ता 🚜🌾

चार वर्षांची प्रतीक्षा संपली! पिंपळगाव माळवीतील शेतकऱ्यांना शेवटी मिळालाच मोकळा रस्ता
🚜
🌾

नगर प्रतिनिधी
पिंपळगाव माळवी येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला शेतीचा रस्ता अखेर चार वर्षांच्या संघर्षानंतर खुला करण्यात आला आहे! कृषी दिनाचे औचित्य साधून हा रस्ता ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात आणि जल्लोषात उघडण्यात आला.

महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना गेली चार वर्षे आपल्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. परिणामी शेती पडीक राहिली, उत्पादन थांबले आणि शेतकऱ्यांवर अन्याय झाला.

परंतु तहसीलदार संजय शिंदे यांच्या पुढाकाराने आणि सावेडी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या सक्रिय सहभागामुळे शेवटी न्याय मिळाला!
वादग्रस्त रस्त्यावरून वादीने केलेले अपील उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या समोर नाकारले गेले आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला गेला.

रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते:

महादेव भोसले, गोरक्षनाथ भोसले, भगवान भोंदे, नारायण गायकवाड, गोरख आढाव, निर्मला भोंदे, सागर ठोंबरे, नितीन काळे, कोतवाल दळवी मॅडम, शुभम भोंदे, दादासाहेब भोंदे, रेणुबाई भोंदे, स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थ.

गावकऱ्यांनी शैलजा देवकाते मॅडम यांचा विशेष सत्कार करत आभार मानले.


📢 #शेतकऱ्यांचा_विजय #RastaZindabad #AgricultureDay2025 #MetroNewsExclusive #GroundReality

 

🎥 हा रस्ता म्हणजे फक्त माती नव्हे, तर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे!